20.5 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeमहाराष्ट्रकॉंग्रेस बंडखोर निलंबित

कॉंग्रेस बंडखोर निलंबित

मुंबई : प्रतिनिधी
भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटानंतर काँग्रेसनेही बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करुनही आपल्या निर्णयावर ठाम राहिलेल्या नेत्यांना काँग्रेसने बाहेरचा रस्ता दाखवला. काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल, कमल व्यवहारे, जयश्री पाटील, राजेंद्र मुळक यांचे ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आले. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी यासंदर्भात माहिती दिली.

रामटेक विधानसभा मतदारसंघातील राजेंद्र मुळक, काटोलमधील याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती येथून आबा बागुल, कसबा पेठेतून कमल व्यवहारे, सांगलीतील जयश्री पाटील यांना सहा वर्षांसाठी पक्षाने निलंबित केले. सांगलीत काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने सांगली विधानसभेतून जयश्री पाटील यांना अपक्ष रिंगणात उतरवले. त्यांना खासदार विशाल पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार यांनी काटोलमध्ये बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरला.

त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली. कॉंग्रेसचे नेते आणि पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागूल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करून उमेदवारी दाखल केली. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR