16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकाँग्रेसचे ‘संविधान बचाओ’ अभियान सुरू

काँग्रेसचे ‘संविधान बचाओ’ अभियान सुरू

१०० दिवसीय असणार अभियान काँग्रेस नेते अजय माकन यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवार दि. १६ ऑगस्टपासून १०० दिवसीय ‘संविधान रक्षक मोहीम’ सुरू करण्यात आली. संविधानाचे रक्षक म्हणून लोकांची नोंदणी करण्यासाठी ही मोहीम आहे. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारताच्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिवशी या अभियानाची सांगता दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये एका मोठ्या कार्यक्रमाने होणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन आज यांच्या हस्ते या मोहिमेची सुरूवात करण्यात आली. यावेळी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव आणि काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोथिया उपस्थित होते. यावेळी बोलताना अजय माकन म्हणाले की, संविधानासमोरील आव्हाने आणि धोके अजूनही कायम आहेत. कारण तेच लोक सत्तेत आहेत. ज्यांना निवडणुकीपूर्वी संविधान बदलायचे होते. जगात इतर सर्व देश अशांततेचा सामना करत असताना केवळ संविधानामुळेच भारत लोकशाही म्हणून यशस्वी झाल्याचेही त्यांनी नमुद केले.

३ लाख लोकांची नोंदणी
अजय माकन म्हणाले की, आतापर्यंत तीन लाख लोकांनी संविधान रक्षक स्वयंसेवकांनी या अभियानात नावनोंदणी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांनी स्वत:ही संविधान रक्षक स्वयंसेवक म्हणून नावनोंदणी केल्याचेही सांगितले. या मोहिमेची अधिक माहिती देताना राजेश लिलोथिया म्हणाले की, ज्या शक्तींनी संविधानाचा मसुदा तयार होत असताना त्याला विरोध केला होता. आणि त्याच्या प्रती जाळल्या होत्या, त्याच शक्ती आज सत्तेत आहेत. त्यामुळे संविधानाला सतत धोका असल्याचे ते म्हणाले.

देशातील प्रत्येक गावात मोहीम
ही मोहीम देशभरात प्रत्येक गावापर्यंत पोहोचवली जाईल. प्रत्येक गावात एक पुरुष आणि एक महिला असे दोन संविधान रक्षक स्वयंसेवक तयार केले जातील, त्यांना यासाठी प्रशिक्षित केले जाईल, असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR