पूर्णा : भविष्यात मानवी जीवनासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक असून त्याचे जतन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ऍड. नितीन भोसले यांनी केले. येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या मौजे शिरकळस येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या उपक्रमांतर्गत गावक-यांसाठी पाणी आडवा पाणी जिरवा या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. मारोती भोसले यांनी प्रस्ताविकामध्ये सविस्तर भूमिका मांडली. पुढे बोलताना ऍड. भोसले म्हणाले, शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करून नदी नाल्यावर छोटे छोटे बंधारे बांधले पाहिजे. जेव्हा पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते तेव्हा त्याचे संवर्धन करणे हे सर्वांचीच जबाबदारी आहे. पावसासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्याचे संगोपण केले तरच वृक्ष संवर्धन होईल व पावसाचे प्रमाण वाढेल. पाण्याचे संवर्धन करणे हे मानवी जीवनासाठी अत्यावश्यक असून भविष्यात मानवासाठी पाणी हीच मोठी संपत्ती असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच माणिकराव भोसले, तंटामुक्तीचे अध्यक्ष बबनराव भोसले, प्रयोशील शेतकरी भागवतराव भोसले, सचिन भोसले, रावसाहेब भोसले, कृष्णा भोसले, अनंता भोसले, तामकळस येथील बाजीराव तनपुरे, बालाजी तनपुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजे संभाजी वाचनालयाचे संचालक पंकज भोसले यांनी केले व आभार गणेश भोसले यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुरेश भोसले, पंढरी भोसले, हरिभाऊ भोसले व गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.