22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयनिवडणुकीत घातपाताचा कट उधळला; ‘इसिस’च्या भारतातील प्रमुखाला अटक

निवडणुकीत घातपाताचा कट उधळला; ‘इसिस’च्या भारतातील प्रमुखाला अटक

दिब्रुगड : आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी गट इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाच्या दोन दहशतवाद्यांना भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अटक केली. लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे मोठे यश मानले जात आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, धुबरी जिल्ह्याजवळील बांगलादेशातून इसिस दहशतवादी भारतात घुसले आणि राज्यात काहीतरी मोठे करण्याचा त्यांचा विचार होता. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये इसिस इंडियाचा प्रमुख हॅरिस फारुकी आणि त्याच्या एका सहाय्यकाचा समावेश आहे.

आसाम एसटीएफचे महानिरीक्षक पार्थसारथी महंता म्हणाले, भारतातील इसिसचे दोन प्रमुख नेते शेजारच्या देशात (बांगलादेश) तळ ठोकून असल्याची माहिती एका एजन्सींकडून मिळाली होती. ते काहीतरी मोठे करण्यासाठी धुबरी सेक्टरमध्ये भारतात प्रवेश करतील.

माहिती मिळताच त्यांनी विशेष टीम तयार करून शोध मोहीम राबवली. आयजीपी पार्थसारथी महंत यांच्या नेतृत्वाखालील एसटीएफच्या पथकाने अतिरिक्त एसपी कल्याणकुमार पाठक आणि इतर अधिका-यांनी ही कारवाई केली आणि त्यांना स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेतले.

आसामचे पोलिस मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रणवज्योती गोस्वामी यांनी सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दोघांना धरमशाला परिसरातून पकडले आणि नंतर त्यांना गुवाहाटी येथील एसटीएफ कार्यालयात आणले. या दोघांची ओळख पटली असून आरोपी हॅरिस फारुकी उर्फ ​​हॅरिस अजमल फारुकी (रा. चक्रता, डेहराडून) हा भारतातील इसिसचा प्रमुख असल्याचे आढळून आले आहे, असे त्यांनी सांगितले. तो म्हणाला की त्याचा साथीदार पानिपत निवावी अनुराग सिंग उर्फ ​​रेहान याने इस्लाम धर्म स्वीकारला असून त्याची पत्नी बांगलादेशी नागरिक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR