नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांखाली अमेरिकेकडून कथितरित्या भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल केला आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा प्रकार गंभीर असल्याचे म्हटले आहे.
आमच्या सरकारी धोरणाच्या विरोधातील अमेरिकेचे कृत्य असल्याचे मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संगठित गुन्हेगारी, तस्करी, हत्यारांची तस्करी आणि कट्टरपंथीयांची युती हे गंभीर आहे. यासाठीच उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी अशी मागणीही भारताने केली आहे. बागची म्हणाले की अमेरिकेसोबत द्विपक्षिय सुरक्षा करारावर चर्चेदरम्यान अमेरिकेच्यावतीने काही माहिती शेअर करण्यात आली होती.
कट्टरपंथीयांमध्ये युती
ज्यामध्ये संघटित गुन्हे, दहशतवाद आणि कट्टरपंथीयांमध्ये युती असल्याची माहिती दिली. या सूचनांना आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो त्यामुळेच एक उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. अमेरिकत दाखल प्रकरणात भारतीय अधिका-याचा उल्लेख होणे हे चिंताजनक आहे.
व्हिएन्ना कराराचे पालन करावे
कॅनडाबाबत बोलायचे झाल्यास आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे की, कॅनडात भारतविरोधी कट्टरपंथियांना आश्रय देण्यात आला आहे, तसेच हा महत्वाचा मुद्दा आहे. कॅनडात आमच्या राजदुतांना टार्गेट केले जात आहे. आमची इच्छा आहे की कॅनडाने व्हिएन्ना कराराच्या अटी-शर्तींचे पालन करावे. कॅनडाचे राजदूत आमच्या अंतर्गत विषयांमध्ये दखल देत आहेत, हे कदापी स्विकारार्ह नाही.