पूर्णा : येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ पी.डी सूर्यवंशी व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.भीमराव मानकरे यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर संविधानाच्या ग्रंथाचे पुष्प अर्पण करून पुजन करण्यात आले.
सांस्कृतिक प्रभारी प्रा.डॉ प्रकाश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करून संविधानाचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविकाचे वाचन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ पी.डी सूर्यवंशी यांच्या सोबत सामुहिक वाचन करण्यात आले. आभार डॉ. प्रभाकर किर्तनकार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रसिध्दी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय कसाब, क्रीडा संचालक प्रा.डॉ.भारत चापके, प्रा. डॉ.दीपमाला पाटोदे, प्रा.डॉ.संतोष कु-हे, प्रा.डॉ.अशोक कोलंबीकर, डॉ. विलास काळे, प्रा. डॉ.जितेंद्र देशमुख, प्रा.डॉ.मारोती भोसले, प्रा.डॉ.शारदा बंडे, प्रा.जगन्नाथ टोंपे, प्रा.दता पवार, प्रा. सुजाता घन, कनिष्ठ लिपीक दत्ता कदम, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.