28.4 C
Latur
Friday, July 5, 2024
Homeक्रीडासूर्याच्या झेलवरून वाद

सूर्याच्या झेलवरून वाद

सोशल मीडियावर वेगवेगळे दावे

नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर डेव्हिड मिलरची अप्रतिम कॅच पकडली आणि तिथेच सामना भारताने जिंकल्यात जमा झाला. टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात भारताचने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ७ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीपलेल्या एका झेलमुळे भारताचा विजय सोपा झाला. या झेलनंतर सूर्यकुमार यादवचे कौतुक केले जात आहे. मात्र सूर्यकुमारने घेतलेल्या झेलवरुन वाद देखील निर्माण झाला आहे.

सूर्यकुमार यादवच्या या झेलबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. यामध्ये सूर्यकुमारने जेव्हा झेल टीपला तेव्हा त्याचा एक पाय सीमारेषेला लागला होता असं सोशल मीडियावर म्हटलं जातंय. तसेच सूर्यकुमार यादवने झेल घेतला त्या ठिकाणची बॉऊंड्री लाईन मागे घेतल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात होता.

बाऊंड्री लाईन मागे का घेतलेली?
सूर्यकुमारने झेल घेतला, तेव्हा बाऊंड्री लाईन मागे घेतल्याचे दिसून येत आहे. यावेळी सफेद रंगाची पट्टी व्हीडीओ आणि फोटोमध्ये दिसत आहे. मात्र ही लाईन गेल्या सामन्यातील होती. गेल्या सामन्यात सफेद कलरच्या दिसणा-या लाईनवर बाऊंड्री ठेवण्यात आली होती. त्यावेळी खेळपट्टी देखील वेगळी होती. मात्र अंतिम सामन्याच्या खेळपट्टीनूसार बाऊंड्री लाईन मागे घेण्यात आली होती.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
सोशल मीडियावर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, त्या दिवशी वेगळीच फिल्डिंग लागली होती. कारण रोहित शर्मा कधी लॉन्ग-ऑनवर उभा राहत नाही. परंतु त्यावेळी तो तिथे होता. जेव्हा चेंडू माझ्या दिशेने येत होता तेव्हा तिकडे धावताना मी सर्वांत आधी रोहितकडे पाहिले. मला चेंडू पकडायचा तर होता, परंतु रोहित जवळ असता तर त्याच्याकडेच मी तो फेकला असता. पण तो जवळ नव्हता. यानंतर डोक्यात चक्र फिरले आणि मी मैदानाबाहेर जाऊन परत झेल टिपण्याचा मार्ग निवडला, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR