28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीयहंगामी अध्यक्षाच्या नियुक्तीवरुन वाद

हंगामी अध्यक्षाच्या नियुक्तीवरुन वाद

मोदी सरकारची बुलडोझर मानसिकता काँग्रेसची बोचरी टीका

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा २४ जूनपासून सुरू होणा-या संसदेच्या अधिवेशनावर लागल्या आहेत. १८ व्या लोकसभेचे अध्यक्षपद कुणाकडे असणार, यावरुन सुरू असलेल्या चर्चांदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती केली आहे. पण, आता या नियुक्तीवरुन नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत, हे संसदीय परंपरेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

जयराम रमेश म्हणाले की, परंपरेनुसार ज्येष्ठ खासदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. प्रथेनुसार कोडीकुन्नील सुरेश यांची या पदावर नियुक्ती व्हायला हवी. पण, त्यांची नियुक्ती न करणे, ही सरकारची बुलडोझरची मानसिकता आहे. सरकार पहिल्या दिवसापासून मनमानी कारभार करत आहे. रमेश पुढे म्हणाले की, काँग्रेसचे कोडीकुन्नील सुरेश आणि वीरेंद्र कुमार (भाजप) हे दोघेही १८ व्या लोकसभेत त्यांचा आठवा कार्यकाळ पूर्ण करत आहेत.

२०१९ मध्ये वीरेंद्र कुमार आणि २०१४ मध्ये कमलनाथ हंगामी अध्यक्ष बनले होते. वीरेंद्र कुमार आता मंत्री झाले आहेत, त्यामुळे केोडीकुन्नील सुरेश यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती व्हायला हवी होती, पण सरकारने तसे केले नाही. भाजप बुलडोझर राजकारणाच्या मानसिकतेतून बाहेर आले नाही. पहिल्या दिवसापासून त्यांना स्पर्धा करायची आहे. आम्हीच सरकार आहोत, हे दाखवायचे आहे. मात्र, जनादेश पंतप्रधानांच्या विरोधात आहे. ते (पीएम मोदी) आता ‘श्री ४००’ नसून ‘श्री २४०’ आहेत, अशी बोचरी टीकाही रमेश यांनी यावेळी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR