28.7 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमनोरंजन‘बॉर्डर २’ चित्रपटावरून वाद

‘बॉर्डर २’ चित्रपटावरून वाद

लोंगेवालाच्या युद्धात सहभागी असलेले हवालदार यांचा आक्षेप

मोहाली : नुकताच प्रदर्शित झालेली ‘बॉर्डर-२’ चित्रपट जरी धुमाकूळ घालत असला तरी, १९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाचा वाद थांबलेला नाही, ज्यात लोंगेवालाची लढाई दाखवण्यात आली आहे. या युद्धात सहभागी असलेले मोहालीचे हवालदार मुख्तियार सिंह यांचा दावा आहे की मोर्चावर १२० भारतीय जवानांनी हजारो पाकिस्तानी सैनिक आणि रणगाड्यांचा जोरदार मुकाबला केला आणि फक्त ३ जवान शहीद झाले होते, तर चित्रपटात जवळजवळ सर्वांना शहीद दाखवण्यात आले आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, वास्तविक इतिहास चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला, ज्यामुळे त्यांना दु:ख झाले आहे. ते या प्रकरणी २ वर्षांपासून राजस्थानचे मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांना पत्रे लिहित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सनी देओलकडून त्यांची हीच अपेक्षा आहे की, जर काही करू शकत नसतील, तर किमान त्या युद्धात जिवंत राहिलेल्या सैनिकांना भेटावे. आम्ही त्या मोर्चाचे खरे नायक आहोत, पण आम्हाला कोणी विचारत नाही.

मी रेकी करणारे जहाज पाहून अलर्ट दिला होता
चंदीगडपासून २६ किलोमीटर दूर मोहालीच्या कुराली येथे राहणारे हवालदार मुख्तियार सिंग यावेळी ८१ वर्षांचे आहेत. ते म्हणाले की, जेव्हा भारत-पाकिस्तानचे १९७१ मध्ये युद्ध झाले होते, तेव्हा मी २६ वर्षांचा होतो. ही गोष्ट ४ आणि ५ डिसेंबर १९७१ ची आहे. पाकिस्तानचे रेकी करणारे जहाज आमच्यावरून गेले. यावेळी कुलदीप सिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली अधिका-यांची बैठक सुरू होती. तेव्हा मी साहेबांना सांगितले की, हे पाकिस्तानचे जहाज आहे. यावर चंद्र-तारा बनलेला आहे. गुप्तचर विभागाचा स्वत:चा अहवाल होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR