अमरावती : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरून अमरावती जिल्ह्यात वाद रंगला आहे. यात खासदारांनी राजीनामा द्यावा व बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवावी; हे नवनीत राणा यांचे आव्हान खासदार बळवंत वानखडे यांनी स्वीकारल आहे. यामुळे आता अमरावती जिल्ह्यात आजी- माजी खासदारांमध्ये कलगी तुरा रंगला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. यामुळे ईव्हीएमवरून राज्यात वादंग सुरू आहे. अशातच ईव्हीएमवर आक्षेप घेणा-या अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांना आव्हान देत माजी खासदार नवनीत राणा यांनी राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक लढवावी; असे आव्हान दिले होते. राणा यांचे हे आव्हान खासदार वानखेडे यांनी स्वीकारले आहे.
जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी राजीनामा द्यावा. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा सुद्धा राजीनामा देतील व या दोन्ही निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात; असं थेट आव्हान भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांना दिले होते. बळवंत वानखडे यांनी देखील नवनीत राणा यांचं हे आव्हान स्वीकारलेल आहे. नवनीत राणा जेव्हा म्हणतील तेव्हा मी राजीनामा देण्यास तयार आहे.
लेखी पत्र आणून द्यावे
नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्याची पोट निवडणूक हि बॅलेट पेपरवर निवडणुक घेण्यात येईल, असे लेखी पात्र निवडणूक आयोगाकडून आणून द्यावे. यानंतर नवनीत राणा जेव्हा म्हणतील तेव्हा मी राजीनामा देण्यास तयार आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास तयार आहे; असे सांगत नवनीत राणा यांचे आव्हान आपण स्वीकारत असल्याचं खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले. यामुळे आता जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे व माजी खासदार नवनीत राणा यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलेला आहे.