29.5 C
Latur
Thursday, April 10, 2025
Homeराष्ट्रीयस्वयंपाकाचा गॅस ३०० रूपयांनी स्वस्त

स्वयंपाकाचा गॅस ३०० रूपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने किचन बजेटमध्ये थोडा दिलासा दिला. जागतिक महिला दिनी, मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केली. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये २०० रुपयांची कपात करण्यात आली होती. गॅस सिलेंडरच्या किमती एकूण ३०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. जून २०२३ मध्ये गॅस सिलेंडर ११०० रुपयांवर पोहचल्या होत्या. गेल्या सात महिन्यांपासून १४.२ किलोच्या सिलेंडरचा भाव ९०२.५० रुपये होता. गॅस सिलेंडरचा भाव आता ८०२.५० रुपयांवर आला आहे.

सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमतीत दरवाढ केली नाही. १४.२ किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. उलट त्यात ३०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हा बदल निवडणुकीपूरताच आहे की नंतर पण ही कपात कायम राहिल, हे लवकरच समोर येईल.

पंतप्रधान मोदींचे ट्विट
महिला दिवसाचे औचित्य साधत आम्ही एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नारी शक्ती म्हणून महिलांचे जीवनमान सोपे होईल. कोट्यवधी कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होईल. हे पाऊल पर्यावरण सुरक्षेसाठी पण मदतीचे ठरेल. त्यामुळे सर्व कुटुंबांचे आरोग्य चांगले होईल.

उज्ज्वला सबसिडीला मुदतवाढ
मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिल्ािंडरबाबत पण मोठा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिल्ािंडरवरील अनुदान एक वर्षांसाठी वाढविण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेतंर्गत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर ३०० रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या कालावधीत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR