22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमराठ्यांची भूमिका कोर्ट ऐकणार : मुख्यमंत्री शिंदे

मराठ्यांची भूमिका कोर्ट ऐकणार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : आताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला असून क्युरेटिव्ह पिटीशन २४ जानेवारीला कोर्ट ऐकणार आहे. ही याचिका फेटाळेल असे म्हटले जायचे. पण सुप्रीम कोर्ट हे ऐकणार आहे, त्यामुळे मराठा समाजासाठी मोठा दिलासा आहे. २४ जानेवारीला वकिलांची तज्ज्ञ फौज बाजू मांडेल, मराठा समाज मागास कसा आहे हे सांगेल, परिस्थिती सांगेल. सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर करण्याचे काम वकिलांची फौज करेल. मला वाटते मराठा सामाजाला न्याय मिळेल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली आहे. बीडमध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे यांनी येत्या २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. जरांगेंच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मागच्या सरकारने मविआ सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी जे पुरावे द्यायला हवे होते ते मांडले नव्हते. पण यावेळी निष्णात वकिलांची फौज बाजू मांडेल. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे, सर्व जाती धर्मांना माझे आवाहन आहे, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. क्युरेटिव्ह पीटिशन ऐकली जाणं ही जमेची बाब आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वांची इच्छा आहे, सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांना वाटतं मराठा आरक्षण मिळावे ही सर्वांची इच्छा आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही बाजू मांडू, सर्वांनी शांतता राखावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR