35.9 C
Latur
Saturday, March 14, 2026
Homeमहाराष्ट्रगोव-यांचे दर वधारले

गोव-यांचे दर वधारले

गॅस टंचाईने फुटला घाम

पुणे/नागपूर : इराणवर इस्रायल-अमेरिकेने चढवलेलला हल्ला., त्यानंतर युद्धाला फुटलेलं तोडं, याला आज 15 दिवस उलटून गेले आहेत. पण तीन देशांच्या या युद्धाच्या अख्ख्या जगाला फटका बसत असून अनेकांना त्याची झळ पोहोचली आहे. भारताला युद्धाचे चटके बसत असून इंधन टंचाईमुळे, गॅसच्या तुटवड्यामुळे लोकं हवालदिल झाले आहेत.

महाराष्ट्राही गॅसची टंचाई असून लोकं पॅनिक झाले आहे, गॅसऐवजी इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या यांचा वापरक करत आहेत. मात्र मोठे व्यवसाय, हॉटेल मालक यांनाही सिलेंडरचा तुटवडा भासत असून अनेकांनी चुलीकडे मोर्चा वळवला. तर काहींनी आता स्वंपाकासाठी पारंपारिक मार्ग निवडला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलिंडरच्या वितरणावरती निर्बंध आले असल्याने आता शेणाच्या गोव-यांना मागणी वाढली आहे.

जळगावात गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने म्हशीच्या तसेच गायीच्या शेणापासून तयार होणा-या गोव-यांची विक्री वाढली आहे. व्यवसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले असून चूल पेटवण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी शेणाच्या गोव-यांचा वापर केला जात आहे.

गोव-यांची वाढली मागणी
अनेकांनी चुलीचा पर्याय वापरायला सुरुवात केल्याने लाकडांबरोबरच, म्हशीच्या तसेच गायीच्या शेणाच्या गोव-यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाकडांमुळे मोठया प्रमाणात धूर होत असल्याने त्याला पर्याय म्हणून, तसेच चूल लवकर पेटण्यासाठी शेणापासून तयार होणा-या गोव-या घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सुरुवातीला कवडीमोल असलेल्या तसेच गोव-यांची आता चांगली विक्री होत असून भावही वाढला आहे.

आर्थिक हातभार मिळाला
दोन पैसे मिळत असल्याने आर्थिक हातभार लागत असल्याचे पशुपालकांनी सांगितलं आहे. संपूर्ण दिवसभरात महिला मजुरांच्या माध्यमातून ६०० ते ७०० गोव-या तयार केल्या जात असून त्यापैकी किमान ५०० गोव-यांची रोज विक्री होते. घरगुती वापराबरोबरच तसेच हॉटेल व्यवसायिकांकडून मागणी वाढली असून एक दिवस आधीच बुकिंग करून गोव-या घेऊन जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. ७ रुपये तसेच १० रुपयाला एक याप्रमाणे गव-यांची विक्री होत असून गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने शेणापासून तयार होणा-या गव-यांना अच्छे दिन आल्याचा पाहायला मिळत आहे.