पुणे : गायीच्या दुधाच्या दरात आता २ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता प्रतिलिटरमागे दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहे. पुण्यात पार पडलेल्या दुध उत्पादकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी दूध संघाची पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. म्हशीच्या दुधाच्या दरात मात्र कुठलीही वाढ झालेली नाही.