पुणे : प्रतिनिधी
शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वर चढत आहे. आता पुन्हा एकदा भर रस्त्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे समोर येत आहे. रक्तबंबाळ होईपर्यंत चाललेली हाणामारी पुणेकरांनी पाहिली आहे.
पुण्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. दोन व्यक्तींच्या झालेल्या भांडणात कोयत्याचा वापर केल्याचे समोर आले आहे. पुणे शहरामध्ये भर रस्त्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात चाललंय तरी काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.