34.2 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रनगर जिल्ह्यात शंभरीपार दोन हजार मतदार

नगर जिल्ह्यात शंभरीपार दोन हजार मतदार

नगर : प्रतिनिधी
नगर जिल्ह्यात एकूण ३६ लाख ३५ हजार मतदार असून, यात २००१ मतदार वयाने शंभरी गाठलेले आहेत. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात शंभरी गाठलेले सर्वाधिक २८७ मतदार आहेत. सर्वांत कमी अकोले विधानसभा मतदारसंघात ६८ मतदार आहेत. शंभरी गाठलेल्या मतदारांमध्ये एक ११० वर्षांचा, तर एकाने १२० वयोमान गाठलेले असे मतदार आहेत.

नगर जिल्ह्यातील शिर्डी (राखीव) आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होईल. मतदान प्रक्रिया सुलभतेने व्हावी, यासाठी नगर जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदान केंद्रावर कोणत्याही उणिवा राहू नयेत, यासाठी बैठकांचे सत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR