छत्रपती संभाजीनगर : भाजप सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई महामार्गावरील समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भेगा पडल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे. महिनाभरापूर्वीच समृद्धी महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली होती. यामुळे समृद्धी महामार्गाची निर्मिती आणि दुरुस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधून जाणा-या समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या आहेत. महिन्याभरापूर्वी समृद्धी महामार्गाची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र आता हे सिमेंटचे तुकडे पुन्हा एकदा निघताना दिसत आहेत. त्यामुळे या भेगा पुन्हा उघड्या पडल्या आहेत. यामुळे समृद्धी महामार्गाची निर्मिती आणि दुरुस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भेगांमधील सिमेंट बाहेर पडू लागले
महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. याच समृद्धी महामार्गावर ११ जुलैला भेगा पडल्या होत्या. यानंतर राज्य विकास महामंडळाकडून या भेगा भरण्याचे काम केले गेले. यानंतर आता अवघ्या महिन्याभरातच पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. या भेगांमधील सिमेंट बाहेर पडू लागले आहे. त्यातील खपल्या हाताने निघत आहेत.