28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रजालना दगडफेक प्रकरणी १५० जणांवर गुन्हे

जालना दगडफेक प्रकरणी १५० जणांवर गुन्हे

जालना :
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाने मोर्चा काढला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यासाठी निघालेल्या शिष्टमंडळासोबत आलेले आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले.

यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या खासगी वाहनासह इतर वाहनांची तोडफोड केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान आता या प्रकरणात १५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR