बीड : उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया यावर आली आहे. ‘गोळीबार प्रकरणात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत डीजींना आदेश देण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे.
फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या दौ-यावर असून, यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे हा विचार न करता कायदेशीर कारवाई केली जाईल.
गोळीबाराची ही घटना पोलिस स्टेशनमध्ये का घडली?, गोळीबार झाला याचे सत्य आपल्याला काढावे लागेल. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजींना दिले आहेत. या संदर्भात अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल, असे यावेळी फडणवीस म्हणाले..