25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रवाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा, अविश्वासू

वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा, अविश्वासू

अनिल देशमुखांनी वाझेचे आरोप फेटाळले

नागपूर : प्रतिनिधी
मुंबई पोलिस दलातून निलंबीत केलेले अधिकारी सचिन वाझे याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल असा बॉम्ब टाकला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे याने गंभीर आरोप केले. सचिन वाझेने आरोप केल्यानंतर तासाभरातच अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच सचिन वाझे हा गुन्हेगार आहे. ही व्यक्ती विश्वास ठेवण्यालायक नाही असे हायकोर्टाने म्हटल्याचा दाखला देखील त्यांनी या वेळी दिला. ते नागपुरात बोलत होते.

अनिल देशमुख म्हणाले, सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील वाझेबद्दल बोलताना वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, असे म्हटले होते. दोन खुनाचा त्याच्यावर गुन्हा आहे. त्यामुळे सचिन वाझेच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे देखील हायकोर्ट म्हणाले होते. सचिन वाझे याला हाताशी धरून फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत.

देशमुखांचा फडणवीसांवर पलटवार
सचिन वाझेच्या आरोपानंतर अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच पलटवार केला आहे. अनिल देशमुख म्हणाले, चार-पाच दिवसांपूर्वी मी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र पाठवले होते. मी केलेल्या त्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे याला हाताशी धरून माझ्यावर आरोप केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR