नवी दिल्ली : जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाचा समावेश होतो. पोतुर्गाल आणि अल नसरकडून खेळणा-या या दिग्गज फुटबॉलपटूने सोशल मीडियावर एक खास विक्रम केला आहे. सोशल मीडियावर एक अब्ज म्हणजेच १०० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा तो पहिला व्यक्ती ठरला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोनाल्डोची लोकप्रियता त्याच्या नव्या इंस्टाग्राम चॅनेलमुळे आणखी वाढली आहे.
३९ वर्षीय रोनाल्डोने यू ट्यूब अकाउंट बनवले होते आणि एका आठवड्यातच त्याच्या फॉलोअर्सची संख्या ५० दशलक्ष म्हणजेच पाच कोटींच्या पुढे गेली. या काळात त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर ६३९ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या १०० कोटी फॉलोअर्सपैकी सर्वात मोठा वाटा आहे. मँचेस्टर युनायटेड आणि रिअल माद्रिदच्या या माजी खेळाडूचे फेसबुकवर १७०.५ दशलक्ष म्हणजेच १७ कोटी फॉलोअर्स आहेत आणि एक्सवर ११३ दशलक्ष म्हणजेच ११ कोटी फॉलोअर्स आहेत.
चिनी प्लॅटफॉर्म वीबो आणि कुआइशूवर देखील त्याचे काही फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले की, माज्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, तुमच्या समर्थनासाठी आणि माज्या आयुष्याचा एक भाग असल्याबद्दल धन्यवाद. सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे आणि एकत्र मिळून आम्ही जिंकत राहू, जिंकू आणि इतिहास घडवू. यापूर्वी पोतुर्गालच्या या स्टार फुटबॉलपटूने, ज्याला बॅलोन डी ओरसाठी निवडण्यात आले नव्हते, त्याने क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात कारकिदीर्तील विक्रमी ९०० वा गोल केला होता. त्याच्या ९०० गोलांपैकी निम्मे गोल रिअल माद्रिदसाठी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त, त्याने स्पोर्टिंग लिस्बन, मँचेस्टर युनायटेड, जुव्हेंटस आणि सध्याच्या क्लब अल नासरसाठी उर्वरित गोल केले आहेत.