क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन २७ टक्क्यांनी घसरला

न्यूयॉर्क : गेल्या सहा आठवड्यांत क्रिप्टोकरन्सीच्या जगात भूकंप आला आहे. या सहा आठवड्यांत गुंतवणूकदारांचे तब्बल $१.१५ ट्रिलियन डॉलर्स(भारतीय चलनानुसार सुमारे १०० लाख कोटी रुपये) स्वाहा झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांवर अक्षरश: डोके फोडून घ्यायची वेळ आली आहे. या तडाख्यापासून अगदी बिटकॉइन आणि इथेरिअम सारख्या क्रिप्टोकरन्सीही वाचू शकल्या नाहीत.

कॉइनमार्केटकैपच्या आकडेवारीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप $४.२८ ट्रिलियन होते, जे बुधवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत) घसरून $३.१३ ट्रिलियनवर आले. अशा प्रकारे गेल्या ६ आठवड्यांत क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप १.१५ ट्रिलियन डॉलरने घसरले आहे. क्रिप्टोकरन्सीच्या या घसरणीसंदर्भात बाजारातील तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. काही लोकांच्या मते हा क्रिप्टो विंटर (क्रिप्टो बाजारात दीर्घ मंदी) परतीचा सुरुवातीचा टप्पा आहे. तर काहींच्या मते, ही घसरण एका चांगल्या उसळीचा मार्ग मोकळा करू शकते.

६ आठवड्यांत त्यात २७ टक्क्यांची मोठी घसरण
जगातील सर्वात महागडी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनलाही मोठा फटका बसला आहे. सहा आठवड्यांपूर्वी $१,२६,००० च्या विक्रमी स्तरावर पोहोचलेले बिटकॉइन बुधवारी संध्याकाळी $९१,४०० च्या आसपास ट्रेड करत होते. अर्थात, ६ आठवड्यांत त्यात २७ टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. महत्वाचे म्हणजे, मंगळवारी बिटकॉइनची किंमत सात महिन्यांत पहिल्यांदाच $९०,००० च्या खाली गेली होती. यामुळे २०२५ मधील त्याची संपूर्ण वाढ संपुष्टात आली होती. गेल्या ७ दिवसांचा विचार करता, बिटकॉइन १३ टक्क्यांनी घसरला आहे.

घसरणीची कारणे
बाजारातील विश्लेषकांच्या मते या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. यांत, अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता कमी होणे. ईटीएफ मधून पैसे काढणे, मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन केलेल्या गुंतवणुकीचे लिक्विडेशन होणे, तसेच मोठ्या गुंतवणूकदारांकडून नफावसुली अशा अनेक कारणांचा समावेश आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|मायक्रो फायन्सच्या कर्जातून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये नेमकं सांगितलं?
01:22
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे ऊस जळून खाक #breakingnews #marathinews
01:05
Video thumbnail
Nanded|खासदारांच्या गावातच मायक्रो फायनान्सचा वसुलीचा तगादा? महिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
04:15
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा परिषदेत अनागोंदी कारभाराचा आरोप! आशाताई भिसेंनी मांडले कागदपत्रे
03:55
Video thumbnail
Nanded|नांदेड शेतकरी चंद्रकांत शिंदे खून प्रकरण: तिघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी, संचालक फरार
01:00
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पाणीचोरीविरोधात मोठी कारवाई! २८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या, पाइप जप्त
02:24
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ महोत्सव! महिला उद्योजिका पॉवर बाजार ३० ऑक्टोबरपासून
02:35
Video thumbnail
Latur|लातूर बसस्थानकात घाणीचं साम्राज्य! काँग्रेसची पाहणी, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न
07:52
Video thumbnail
Latur|लातूर रोडवर कबीर गॅरेजमध्ये चोरी! ऑक्सिजन सिलेंडर लंपास, चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल
01:05
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी | हैबतपूर शिवारातील घटना
00:59
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये साडेचार कोटींचं बसस्थानक तयार, उद्घाटन कधी? | विद्युत फिटिंगचं काम रखडलं
01:00
Video thumbnail
Nanded|केएफ फायनान्स आणि कुबेरफल एकच? शेतकरी मृत्यू प्रकरणात पोलीस अधीक्षकांचा मोठा खुलासा
02:13
Video thumbnail
“नाना पटोले काय माझे मालक आहेत का?” अशोक चव्हाणांचा संतप्त सवाल #breakingnews #digitalekmat
00:27
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाविरोधात मोर्चा | आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर
01:43
Video thumbnail
Latur|बेलगावात शॉर्टसर्किटमुळे ऊसपिकाला आग |३ एकर ऊस जळून खाक, साडेचार लाखांचे नुकसान #breakingnews
01:05

Latest news