23.6 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeराष्ट्रीय'मिचॉन्ग’ चक्रीवादळ झाले कमकुवत

‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ झाले कमकुवत

बुडण्याच्या आणि विजेचा धक्का लागण्याच्या सुमारे १० घटना

चेन्नई : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये बुधवारी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शहरातील ८० टक्के वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. आंध्र प्रदेशात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आणि चेन्नईत पूर आल्याने मिगजोम चक्रीवादळ कमकुवत झाले आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले तीव्र चक्रीवादळ कमकुवत झाल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. चेन्नई विमानतळ उघडण्यात आले आहे.

चेन्नईमध्ये अन्न आणि इतर मदत सामग्रीचे हवाई मार्गे वितरण केले जात आहे. तसेच पुराचा फटका बसलेल्या अनेक सखल भागातून पाणी काढले जात आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, स्टॉर्म वॉटर ड्रेनवर ४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने ४७ वर्षांतील सर्वात जास्त पावसाचा प्रभाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चेन्नईच्या कामराजल सराई, कॅथेड्रल, पाँडी बाजार, धरण, आरके सलाई आणि अण्णा सलाई रोडसह अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या नुकसानीनंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्र सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीसाठी ५०६० कोटी रुपयांच्या अंतरिम मदत निधीची मागणी केली आहे. यासोबतच चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राकडून एक पथक पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे. द्रमुक खासदार टीआर बालू यांनी स्वत: दिल्लीत पंतप्रधान मोदींना हे पत्र दिले आहे.

१७ जणांचा मृत्यू
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नईत मुसळधार पाऊस आणि पूर आल्याने शहर ठप्प पडले आहे. पावसामुळे झालेल्या घटनांमुळे शहरात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रेटर चेन्नई पोलिसांनी सांगितले की, पाणी तुंबलेल्या रस्त्यातून पाणी हटवले जात आहे आणि वाहतूक खूपच मंद आहे. ग्रेटर चेन्नई पोलिसांनी सांगितले की, बुडण्याच्या आणि विजेचा धक्का लागण्याच्या सुमारे १० घटना नोंदवण्यात आल्या आहेत, ज्यांना त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली.

५ हजार सरकारी कर्मचारी मदतकार्यात गुंतले
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसानंतर एनडीआरएफच्या अतिरिक्त पथकांना पाचारण करण्यात आले असून ३०० बोटी सखल भागात तैनात करण्यात आल्या आहेत. इतर जिल्ह्यातील सुमारे ५ हजार सरकारी कर्मचारी मदतकार्यात गुंतले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR