22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीय'रेमल' चक्रीवादळ, सावध राहा!

‘रेमल’ चक्रीवादळ, सावध राहा!

पंतप्रधान मोदींनी दिल्या बैठकीत सूचना देशभरात हाय अलर्ट; १४ तुकड्या तैनात

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘रेमल’ चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारी भागात वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली असून भारतीय हवामानशास्त्र विभाग नुसार, रेमल रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारच्या पहाटे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक घेऊन सुरक्षेसाठी तथा आपदकालीन व्यवस्थेसाठी सूचना दिल्या.

सध्या कोलकाता शहरातील काही भागात पाऊस पडत आहे. बंगालचे राज्यपाल डॉ. सीव्ही आनंद बोस राज्यातील लोकांना चक्रीवादळाबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक घेतली. एनडीआरएफ पूर्व क्षेत्राचे कमांडर गुरमिंदर सिंग यांनी सांगितले की, रेमल चक्रीवादळ आज मध्यरात्री किना-यावर धडकेल. लँडफॉलच्या वेळी वा-याचा वेग ताशी १२०-१३० किमी असेल. या पार्श्वभूमीवर दक्षिण बंगालमध्ये एनडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे हे चक्रीवादळ त्यापूर्वी आलेल्या अम्फानसारखे गंभीर नसेल. दुसरीकडे, या चक्रीवादळामुळे बांगलादेशने मोठ्या प्रमाणावर धोकादायक ठिकाणांहून लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

विमानतळ २१ तासांसाठी बंद
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळ २१ तासांपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे, तर शेकडो गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, कोलकाता, पूर्व मिदनापूर, हावडा, हुगळी येथे मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वा-याचा वेग ताशी १२० किमी राहणार
सोमवारी नादिया आणि मुर्शिदाबादमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलकाता, हावडा, २४ परगणा, हुगळी, बीरभूम, पूर्व बर्दवानमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण बंगालमधील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. रविवारी दोन्ही २४ परगणा भागात पावसासह ताशी १०० ते १२० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कोलकाता, हावडा, हुगळी आणि पूर्व मिदनापूरमध्ये वा-याचा वेग ताशी ७० ते ८० किमीपर्यंत पोहोचू शकतो. वादळाचा कमाल वेग ताशी ९० किमी असू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR