22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रदादा मोकळ्या मनाचा माणूस म्हणून मोक्कातला आरोपी मोकळा सोडला!

दादा मोकळ्या मनाचा माणूस म्हणून मोक्कातला आरोपी मोकळा सोडला!

अख्ख्या महाराष्ट्राला कळाले, जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील सभेत एक वादग्रस्त वक्तव्य केले. विश्वास देवकाते यांच्या एका कार्यकर्त्याला मोक्काच्या कारवाईतून वाचवले असे अजित पवार यांनी म्हटले. एकच वेळ वाचवा असे सांगितल्यामुळे आपण वाचवले असे अजित पवार म्हणाले. मात्र याच मुद्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधला.

दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे. तसाच भोळाही आहे. बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितले की, मी मोक्कातला आरोपी सोडवला. कायदा नमवण्यासाठी सत्ताधा-यांची किती चालते हे दादांनी स्वत: सांगितले, अशा खोचक शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. एवढंच नव्हे तर मी दादांवर टीका केली नाही, त्यांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचे कौतुक केले, अशा शालजोडीतला टोमणाही त्यांनी लगावला.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ट्विटरवरून एक व्हीडीओ आणि त्यासोबत पोस्ट शेअर करत अजित पवार यांच्यावर टीका केली. बारामतीमधील एका सभेत अजित पवार यांनी केलेल्या विधआनाच दाखला देत, आव्हाडांनी दादांवर निशाणा साधला. दादांच्या शब्दातून येथील कारभार कसा उत्तमरित्या सुरू आहे. याची गॅरंटी देण्यात आली, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

२५ हजार कोटींचा टॅक्स माफ करून घेतला
दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे. तसाच भोळाही आहे. बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितले की, मी मोक्कातला आरोपी सोडवला. २५ हजार कोटीचा इन्कमटॅक्स माफ करून घेतला. भारतात सत्ताधा-यांकडून हेदेखील घडू शकते, हे सांगणारा माणूस भोळा नसेल का? पण, सालं काय दुर्दैवं आहे. आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हेपण आम्ही काढू शकत नाही किंवा ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यांना मदतही करू शकत नाही. या देशात कायदा नमवण्यासाठी सत्ताधा-यांची किती चालते, हे सगळे दादा आपल्या तोंडून सांगून गेले.

मोक्कातून वाचविणे धक्कादायक : सुळे
खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी मोक्का लागण्यापासून एखाद्याला वाचवले असेल तर हे धक्कादायक आहे. याचे सरकारने उत्तर द्यायला हवे असे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणे ही बाब धक्कादायक आहे. त्यांनी नेमके कोणाला वाचवले?, कोणत्या केसमधून वाचवले?,आणि एवढ्या मोठ्या मोक्कामधून वाचवण्याची कारणे कोणती होती? याची माहिती द्यायला हवी आणि सोबतच सरकारनेदेखील याचे उत्तर द्यायला हवे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR