बारामती : १० ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे, तिथे एखादा उमेदवार सोडता सर्व पक्षातीलच उमेदवार उभे करणार आहेत. परंतु, दुसरीकडे थोरल्या पवारांना टक्कर देण्याच्या नादात अजित पवारांना स्वपक्षातील उमेदवारच सापडलेले नाहीएत. अजित पवारांच्या वाट्याला सध्यातरी ४८ पैकी चार जागा आल्या आहेत.
त्यापैकी बारामतीची जागा अजित दादांची पत्नी सुनेत्रा पवार लढत आहेत. तिकडे रायगडमधून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे लढत आहेत. हे दोन सोडले तर अजित पवारांना उर्वरित दोन मतदारसंघांत शिंदे गट आणि भाजपाकडून उमेदवार आयातच करावे लागले आहेत. शरद पवारांना टक्कर देता देता अजित पवारांना महायुतीतही जागा सोडवून घेताना नाकीनऊ आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.