मुंबई : बॉलीवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार’ मिळाला आहे. शाहरूखला ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२४’ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरूखने आनंद व्यक्त केला आणि म्हटले की, मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळून खूप वर्ष झालेत यामुळे मला वाटत होते की हा सन्मान मला कधीच मिळणार नाही. मात्र मला हा पुरस्कार मिळाला असे शाहरूख म्हणाला. शाहरुखने स्टेजवरूनच जवानाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. उल्लेखनीय आहे जवान गेल्या वर्षी ७ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाने तुफान कमाई केली होती.
शाहरुख पुढे म्हणाला की, मी पुरस्काराचा लोभी आहे. मला पुरस्कार आवडतात आणि मला पुरस्कार मिळाल्यानंतर खूप आनंद वाटतो. प्रेक्षक अजूनही माझ्या कामाला पसंत करतात, मला पसंत करतात यामुळे मी अजूनही मेहनत करीन. चित्रपटात केवळ कलाकाराचे काम महत्त्वाचे नसते. चित्रपटासाठी अनेक लोकांनी मेहनत घेतली असते. एक कलाकार त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून शिकून कलाकार बनतो. त्यामुळे मला हा पुरस्कार मिळवून देण्यात अनेकांचे योगदान आहे.मी वचन देतो की मी कठोर परिश्रम करत राहीन. मी भारतात आणि परदेशातील चाहत्यांचे मनोरंजन करत राहीन, यासाठी मला नाचावे लागले, पडावे लागले आणि रोमान्स करावा लागला तरी करेल पण पेक्षकांचे मनोरंजन करत राहील असे शाहरूख म्हणाला.
या कलाकारांनाही मिळाला पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेता -शाहरुख खान (जवान)
सवोर्तृष्ट अभिनेत्री -नयनतारा (जवान)
सर्वोत्कृष्ट खलनायक – बॉबी देओल (अनिमल)
सवोर्तृष्ट दिगदर्शक – संदीप रेड्डी वांगा (अॅनिमल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक – विकी कौशल (सॅम बहादुर)