18.7 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeराष्ट्रीयअयोध्येत रामाचे दर्शन रजिस्ट्रेशनशिवाय घेता येणार नाही

अयोध्येत रामाचे दर्शन रजिस्ट्रेशनशिवाय घेता येणार नाही

मुंबई : अयोध्येत गाभा-यात प्रभू रामांची बालस्वरूपातील मूर्ती स्थापित झाली आहे. आता २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर डोळ्यावरची पट्टी काढली जाईल आणि मंदिर दर्शनासाठी खुलं होईल. मात्र तिरूपती येथील बालाजी दर्शनाच्या धर्तीवर पूर्व नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.

प्राणप्रतिष्ठापनेसाठी गेल्या काही दिवसांपासून विधीवत पूजा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संकल्प सोडला असून त्यांच्या उपस्थितीत प्रभू रामाचं दर्शन होणार आहे. २२ जानेवारीनंतर भक्तांना खरी ओढ लागणार आहे ती दर्शनाची. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय दर्शनाला गेल्यास मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

रामाच्या दर्शनासाठी असं कराल ऑनलाईन बुकिंग
– सर्वात आधी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाईट (https://srjbtkshetra.org) वर जा. मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा,
– तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकताच पेज ओपन होईल.
– पेजवर गेल्यावर ‘Darshan’ पर्यायावर क्लिक करा. एक पेज समोर येईल.
– यात दर्शन घ्यायची तारीख, वेळ, भक्तांची संख्या, देश, राज्य आणि मोबाईल नंबर टाकून फोटो अपलोड करावा लागेल.
– या पद्धतीने दर्शनासाठी आपलं बुकिंग होईल
– याच पद्धतीने आरतीसाठी वेगळी बुकिंग करावी लागेल.
बुकिंग केलं नाही तर काय असेल पर्याय
– प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग केलं नाही तर मंदिराजवळील काउंटरवर सरकार मान्यताप्राप्त ओळखत्र दाखवून तिकिट घेऊ शकता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR