22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात उमेदवारांच्या खर्चामध्ये धैर्यशील माने आघाडीवर

कोल्हापुरात उमेदवारांच्या खर्चामध्ये धैर्यशील माने आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे मतदान तिस-या टप्प्यात ७ मे रोजी पार पडल्यानंतर निवडणूक प्रशासनाने अंतिम खर्चाची तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत दोन्ही मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारांचा खर्च हा ५० लाखांच्यावर गेला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने हे निवडणूक प्रचार आणि प्रसारासाठी दैनंदिन खर्चात आघाडीवर आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणूक खर्च विभाग व उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या खर्चानुसार सर्वाधिक ७५ लाख २६ हजार ९३५ इतका खर्च केला आहे. मात्र काही खर्चांवर खासदार माने यांच्यासह खासदार संजय मंडलिक आणि श्रीमंत शाहू महाराज यांनी असहमती दर्शवली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा खर्च ६९ लाख ९२ हजार ३२ रुपये व काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा खर्च ५९ लाख ९८ हजार ९६१ रुपये इतका झाला आहे.

निवडणूक प्रशासनाच्या कर्मचा-यांकडून १२ एप्रिलपासून ते ५ मेपर्यंत उमेदवारांच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला होता. खर्चाची तीन टप्प्यांत पडताळणी पूर्ण झाली. प्रशासनाने देखील आपल्या परीने खर्चाची तपासणी करून आढावा घेतला होता. शिवाय उमेदवारांनी देखील दैनंदिन खर्चाचा आढावा दिला होता.
दोन्हीकडून सादर झालेल्या खर्चाची तिसरी अंतिम पडताळणी पूर्ण झाली आहे. शाहू छत्रपती महाराज यांनी आपल्या खर्चापैकी ७ लाख १२ हजार ८००, तर संजय मंडलिक यांनी ३० लाख ८६ हजार ८६ रुपये खर्च अमान्य केला आहे. हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांनी ४८ लाख रुपये इतका खर्च अमान्य केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR