29.4 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeधाराशिवसास-याला कंटाळून सुनेची आत्महत्या

सास-याला कंटाळून सुनेची आत्महत्या

धाराशिव : प्रतिनिधी
वाईट नजरेने बघणा-या सास-याच्या त्रासाला कंटाळून २१ वर्षीय सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथे १० जानेवारी रोजी रात्री घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सास-याच्या विरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे दि. १५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील जयश्री किरण वडलीक (वय २१) या विवाहितेने दि.१० जानेवारी रोजी रात्री त्यांच्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचा सासरा आरोपी पांडुरंग भिमा वडलीक रा. सारोळा बु. हे जयश्री यांच्याकडे नेहमी वाईट नजरेने बघत होते. ते दारु पिवून येवून जयश्री यांना घाणघाण शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक त्रास देत होते. त्याच्या या जाचास व त्रासास कंटाळून जयश्री वडलीक यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या प्रकरणी मयताची आई अंजना मनोज साठे, रा. क्रांतीनगर, अंबेजोगाई जि. बीड यांनी दि. १५ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे सासरा पांडुरंग वडलीक याच्या विरोधात भा.दं.वि. सं. कलम- ३०६, ५०४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR