22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनदाऊद इब्राहिमला माझी भीती वाटते

दाऊद इब्राहिमला माझी भीती वाटते

बिग बॉसमध्ये सदावर्तेंचा दावा

मुंबई : दाऊद इब्राहिमला माझी भीती वाटते आणि सरकारही मला घाबरते असा दावा वकील गुनरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसमध्ये केला आहे. ‘बिग बॉस १८’ सुरू झाल्यापासून शोमध्ये आतापर्यंत अनेक रंजक किस्से समोर आले आहेत. पहिल्याच दिवशी व्हायरल भाभी हेमा शर्मा आणि तजिंदर पाल सिंह बग्गा यांना घरातील जेलमध्ये टाकण्यात आले होते. यानंतर नॉमिनेशनच्या टास्कमध्ये स्पर्धकांनी एकमेकांवर चांगलीच चिखलफेक केली. आता सदावर्ते यांनी बिग बॉसचा आदेश स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे आणि धमकी देताना ते म्हणाले की, सरकारही मला घाबरते आणि दाऊद इब्राहिमलाही माझी भीती वाटते.

नव्या भागामध्ये बिग बॉसने सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावले आणि कुटुंबातील सदस्यांचे बोलणे ऐकून घेऊन हेमा शर्मा आणि तजिंदर पाल सिंह बग्गा यांना तुरुंगातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बिग बॉसने म्हणाले की, तुरुंग कधीही रिकामे राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी अविनाश मिश्रा, ईशा सिंह आणि करणवीर मेहरा यांना तुरुंगात पाठवल्या जाणा-या एका सदस्याचे नाव घेण्यास सांगितले.यानंतर करणवीर याने गुणरत्न सदावर्ते यांचे नाव घेतले. आपले नाव ऐकताच सदावर्ते चांगलेख संतापले. शोदरम्यान त्यांचा असा अवतार दिसला की, घरातील सदस्यही आश्चर्यचकित झाले. यावेळी सदावर्ते म्हणाले, मला हा निर्णय मान्य नाही. मी जेलमध्ये जाणार नाही. मी आत्ताच खेळ सोडेन. प्रश्न अत्याचाराचा नाही, भूमिकेचा आहे, अशी भूमिका आम्ही न्यायालयात मांडतो, असे सदावर्ते म्हणाले.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांचे हे बोलणे ऐकून बिग बॉसला राग आला आणि त्यांनी आपला निर्णय कायम असल्याचे म्हटले. यावर गुणरत्न सदावर्ते म्हणली की, मला तुरुंगात जाणे मान्य नाही. कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते त्यांच्यावरच ओरडत म्हणाले की, मी जेलमध्ये जाणार नाही. सरकार मला घाबरते आणि दाऊद इब्राहिम मला घाबरतो असे बोलून सदावर्ते यांनी चांगलाच राडा केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR