मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकारामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची विनंती केली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, विजय वडेट्टीवार यांना गेल्या काही दिवसांपासून फोनवरुन मेसेजच्या स्वरुपात धमक्या येत आहेत. याबाबत त्यांनी मीडियाच्या कॅमे-यासमोर कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला.
पण मी यासंदर्भात मुख्यमंर्त्यांना पत्र पाठवलं आहे. सुरक्षेत वाढ करण्याची मागणीया पत्रामध्ये त्यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली आहे. पण अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या विनंतीवर काय कार्यवाही केली हे कळू शकलेलं नाही.