25.3 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeमहाराष्ट्रहोर्डिंग दुर्घटनेतील बळींचा आकडा १७ वर

होर्डिंग दुर्घटनेतील बळींचा आकडा १७ वर

मुंबई : बुधवारी झालेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून आता १७ वर पोहोचला आहे. १३ मे रोजी घाटकोपर येथील पेट्रोल पंपाजवळ असलेले मोठे होर्डिंग वादळामुळे कोसळले. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि नागरिकांचाही अकाली मृत्यू यामुळे ओढवला होता. सुरुवातीला या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर जखमींपैकी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले. नंतर मृतांमध्ये आणखी एखाची भर पडली आहे. ज्यामुळे मृतांचा आकडा आता १७ झाला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये वादळी वारे आणि पावसाने थैमान घातले असतानाच शहरातील घाटकोपर भागामध्ये होर्डिंग कोसळून अनेक निष्पापांचा बळी घेतला. सुरुवातीला या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली, नंतर दोघांचा मृत्यू झाला. आजच्या माहितीनुसार परळ, येथील केईएम रुग्णालयात उपचार घेणा-या राजू मारुती सोनावणे या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अजूनही या दुर्घटनेतील चार रुग्णांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या दुर्घटनेनंतर सदर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आणि यातूनच चौकशीच्या मागणीने जोर धरला. मरण खरंच इतकं स्वस्त आहे का? असा उद्विग्न प्रश्न नागरिकांमधून सातत्याने विचारला जात असताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने शासकीय सूत्रेही हलवण्यात आली आणि आता याच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR