19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeउद्योगदेशातील घाऊक महागाईत घट

देशातील घाऊक महागाईत घट

जुलैमध्ये २.०४ टक्क्यांपर्यंत कमी झाली

नवी दिल्ली : देशातील घाऊक महागाईत जुलैमध्ये घट झाली असून देशातील घाऊक महागाईत घट झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकाचा वापर करून मोजली जाणारी घाऊक महागाई जुलैमध्ये २.०४ टक्क्यांपर्यंत कमी झाली झाली आहे. जूनमधील ३.३६ टक्क्यांच्या १६ महिन्यांच्या उच्चांकाच्या तुलनेत जुलैमध्ये घाऊक महागाई कमी झाली आहे, असे आज बुधवारी प्रसिद्ध केलेल्या सरकारी आकडेवारीवरुन दिसून आले आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये घाऊक महागाई दर (डब्ल्यूपीआय) ३.३६ टक्क्यांवर होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यात सातत्याने वाढ झाली होती. यापूर्वी हा महागाई दर मे महिन्यात २.६१ टक्के तर एप्रिल महिन्यात १.२६ टक्के होता. सरकारकडून आज १४ ऑगस्ट रोजी जुलैच्या घाऊक किंमत निर्देशांकाची आकडेवारी जाहीर केली. जुलैमध्ये घाऊक महागाई दर २.०४ टक्के राहिला. जूनमधील ३.३६ टक्क्यांवरून खाली आला आहे.

जूनमधील १.४३ टक्क्यांच्या तुलनेत जुलैमध्ये उत्पादित उत्पादनांची महागाई १.५८ टक्क्यांवर वाढली. इंधन आणि वीज महागाई जूनमध्ये १.०३ टक्क्यांवरून १.७२ टक्क्यांवर पोहोचली आहे. जुलै २०२४ मधील महागाईवाढीचा सकारात्मक दर प्रामुख्याने अन्नपदार्थांच्या किमती, अन्न उत्पादनांचे उत्पादन, खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, इतर उत्पादनांच्या किमतीतीत वाढीमुळे आहे असे सरकारने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

व्याजदरात कपात होण्याची आशा
जुलैमध्ये किरकोळ महागाईवाढीचा दर जवळपास ५ वर्षांच्या निचांकी पातळीवर आला. जुलैमध्ये किरकोळ महागाईदर ३.५ टक्क्यांवर राहिला. भाज्या, फळे आणि मसाल्यांच्या दरात घट झाली आहे. गेल्या काही महिन्यांत वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना फटका बसला आहे. आता काही प्रमाणात यातून दिलासा मिळाला आहे. महागाईत घट झाल्याने आर्थिक वर्षाच्या दुस-या सहामाहीत व्याजदरात कपात होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR