26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeपरभणीदीपस्तंभतर्फे किर्तनकार, रापेल्लीवार, सातपुते यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर

दीपस्तंभतर्फे किर्तनकार, रापेल्लीवार, सातपुते यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर

मानवत : जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आ. मेघना बोर्डीकर यांच्या दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मानवत तालुक्यातील सोनय्या किर्तनकार, अलका सातपुते व एकनाथ रापेल्लीवार या शिक्षकांना जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरजवळा येथील प्राथमिक शिक्षक सोनय्या किर्तनकार, जि.प. प्राथमिक शाळा उक्कलगाव येथील श्रीमती अलका सातपुते आणि जि.प. प्राथमिक शाळा शाखा क्रमांक ४ मानवत येथील एकनाथ रापेल्लीवार यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल नुकताच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, मूल्यशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन, नवोपक्रम आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नेहमी कार्यतत्पर रहाणा-यांचे कौतुक व्हावे म्हणून हा सन्मान दिला जातो. या पुरस्कारासाठी विलास मिटकरी, किशोर तुपसागर, विलास खरात, श्रीमती माया देवी गायकवाड, संजय पकवाने, रामराव सोळंके, श्रीमती राणी दसमले, दिलीप लाड यांच्यासह शिक्षकवृंदांनी किर्तनकार, श्रीमती सातपुते आणि रापेल्लीवार यांचे अभिनंदन केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR