35 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeक्रीडासलग तिस-या विजयासह गुणतालिकेत दिल्ली ‘कॅपिटल्स’

सलग तिस-या विजयासह गुणतालिकेत दिल्ली ‘कॅपिटल्स’

चेन्नईवर २५ धावांनी मात सीएसकेचा सलग तिसरा पराभव

चेन्नई : चेपॉकच्या घरच्या मैदानावरही चेन्नई सुपर किंग्ज संघाला १८० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना अपयश आले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना केएल राहुलच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकांत ६ बाद १८३ धावा करत चेन्नईसमोर १८४ धावांचे सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना विजय शंकरच्या भात्यातून अर्धशतक आले.

त्याच्यापोपाठ धोनीने संघाकडून दुस-या क्रमांकाची मोठी धावसंख्या केली. पण चेन्नईला काही यशस्वी पाठलाग करणे जमले नाही. दिल्लीच्या संघाने चेन्नईच्या बालेकिल्ल्यात दमदार विजय मिळवत आपल्या खात्यात आणखी २ गुणांची भर घातली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाला १८० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग दहाव्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. १८० प्लस धावा करा अन् चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करा हा एक फॉर्म्युलाच सेट झाल्याचे दिसते. तोच फॉर्म्युला वापरत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दिमाखदार विजयास यंदाच्या हंगामात विजयाच्या हॅटट्रिकचा डाव साधला. सलग तिस-या विजयासह दिल्ली कॅपिटल्सचा संघाने गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेल याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णयÞ घेतला. जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या साथीने लोकेश राहुलने दिल्ली कॅपिटल्स संघाच्या डावाची सुरुवात केली. पण जेक फ्रेझर-मॅकगर्क खातेही न उघडता तंबूत परतला. पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावर लोकेश राहुल आणि अभिषेक पोरेल या जोडीनं दुस-या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचत डाव सावरला. २० चेंडूत ३३ धावा करत अभिषेक पोरेलने आपली विकेट गमावली. त्याची जागा घेण्यासाठी आलेला अक्षर पटेल १४ चेंडूत २१ धावांची भर घालून चालता झाला.

समीर रिझवीनं १५ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. एका बाजूला विकेट पडत असताना केएल राहुल मात्र दिमाखात खेळला. त्याने ५१ चेंडूत क ६ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने केलेल्या ७७ धावांच्या खेळीसह स्टब्सनं १२ चेंडूत केलेल्या २४ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर दिल्लीच्या संघानं निर्धारित २० षटकात धावफलकावर ६ बाद १८३ धावा लावल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR