विशाखापट्टणम : लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार सुरुवात केली आहे. लखनौने या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात २०० पार मजल मारली आहे. लखनौने दिल्ली कॅपिट्ल्ससमोर २१० धावांचं आव्हान ठेवलं आहे.
लखनौने २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून २०९ धावा केल्या. लखनौसाठी निकोलस पूरन आणि मिचेल मार्श या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर एडन मारक्रम आणि डेव्हिड मिलर या दोघांनी छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. दिल्लीच्या गोलंदाजांना लखनौला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात यश आलं. आता दिल्लीचे फलंदाज २१० धावांचं आव्हान गाठणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.