35.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeक्रीडादिल्लीची विजयी घोडदौड

दिल्लीची विजयी घोडदौड

हैदराबादला ७ विकेट्स केले पराभूत

विशाखापट्टनम : आयपीएल २०२५ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची विजयी घोडदौड सुरु आहे. पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर आता सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या उभारून दिल्ली कॅपिटल्सला घेरण्याचा प्रयत्न होता. पण भलतेच घडले. कारण सनरायझर्स हैदराबाद १८.४ षटकांत सर्व गडी गमवून १६३ धावा केल्या आणि विजयासाठी १६४ धावांचे आव्हान दिले.

आयपीएलमधील फलंदाजांची आक्रमकता पाहून १६४ या धावा आरामात गाठल्या जातील यात काही शंका नव्हती. दिल्ली कॅपिटल्सने या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. उपकर्णधार फाफ डुप्लेसिस आणि फ्रेझरने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी ८१ धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यासाठी जीशान अन्सारीला बोलवले. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अर्धशतकी खेळी करणा-या फाफ डुप्लेसिसला गुंतवले.

त्याने २७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारत ५० धावा केल्या. त्यानंतर जेक फे्रजर मॅकगर्कला फिरकीत अडकवलं आणि कॅच अँड आऊट केले. तो ३८ धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुलही त्याच्या फिरकीत फसला आणि त्रिफळाचीत होत तंबूत परतला.

तीन विकेट पडल्यानंतर अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्सने विजयी धावा पूर्ण केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून जीशान अन्सारी वगळता एकही गोलंदाज चालला नाही. जीशान अन्सारीने ४ षटकात ४२ धावा देऊन तीन गडी बाद केले. पण दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो मिचेल स्टार्क.. मिचेल स्टार्कने ३.४० षटकात ३५ धावा देत ५ गडी बाद केले. तर कुलदीप यादवने फिरकीच्या जाळ्यात तीन जणांना अडकवले. दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली आणि विजश्री खेचून आणला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR