22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीअंतेश्वर बंधा-यात गेलेल्या शेतजमिनींच्या मोजणीची मागणी

अंतेश्वर बंधा-यात गेलेल्या शेतजमिनींच्या मोजणीची मागणी

पूर्णा / प्रतिनिधी
तालुक्यातील अंतेश्वर बंधा-यात गेलेल्या शेतक-यांच्या शेत जमिनीचे तात्काळ मोजमाप करावे या मागणीसाठी दि.६ डिसेंबर रोजी अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनात देण्यात आले आहे.

तालुक्यातील गोदावरी नदीवरील अंतेश्वर बंधा-याच्या पाण्याखाली तालुक्यातील जवळपास १४ गावांच्या शेतक-यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यापैकी काही गावांच्या शेतक-यांच्या जमिनीची मोजणी झाली आहे. त्यापैकी महागाव, निळा, कंठेश्वर, कानखेड, सारंगी, अजदापूर इ.गावांच्या शेतक-यांच्या जमिनीची भूसंपादनासाठी आतापर्यंत मोजणी झालेली नाही. सोन्ना येथील बांधीत शेतक-यांच्या जमिनीची मोजणी झालेली असून त्यापैकी काही शेतक-यांची मोजणी बाबत तक्रारही केले आहेत. त्या शेतक-यांच्या जमिनीची फेर मोजणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीच्या वतीने पूर्णा तहसील समोर एकदिवशीय लक्षणीय उपोषण सुद्धा करण्यात आले होते. या संदर्भात निवेदन सुद्धा देण्यात आले पण आतापर्यंत संबंधित गावातील बांधील शेतक-यांच्या जमिनीची मोजणी झालेली नाही. मोजणीसाठी झालेल्या दिरंगाईमुळे भूसंपादनाचे काम रखडले आहे. भूसंपादनासाठी शासनाकडून निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे. बांधीत शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीचे अध्यक्ष बळीराम कदम, रविसाब भालेराव, नवनाथ भालेराव, पंडित भालेराव, हरिहर भालेराव, संदीप मोहिते, एकनाथ मोहिते, गोविंद भालेराव, संभाजी मोहिते, सदाशिव भालेराव, गोपाळ मोहिते, रंगनाथ मोहिते, बालासाहेब मोहिते, बालाजी भालेराव, नागोराव भालेराव, साहेब मोहिते यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR