22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र‘विदेशी’ बोरांना मागणी वाढली

‘विदेशी’ बोरांना मागणी वाढली

पुणे : बाजारात मोठ्या आकाराची बोरे नगर – संक्रांत झाली की, हिवाळ्यात आंबट-गोड गावरान बोरांची भल्याभल्यांना आठवण येते. लहानमुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच या गावरान बोरांची भुरळ पडते. परंतु, गेल्या काही वर्षांत गावरान बोरांची आठवण जराशी पुसट होत चालली आहे. पूर्वी शेताच्या बांधावर असणारी बोरांची झाडे नामशेष होऊ लागली आहे. त्यामुळे आता बाजारात केवळ संक्रांतीच्या सणालाच या बोरांची आवक होताना दिसत आहे.काही ठिकाणी संक्रांतीला देखील विदेशी बोरांना मागणी आहे.

विदेशी संकरित आणि मोठ्या आकारांच्या बोरांनी बाजारपेठ भरली आहे. मात्र, गावरान बोरांची मजा आता काय राहिली नाही. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांच्या जाती निर्माण झाल्या आहेत. पण यात गावरान बोरांची चव मात्र नाही.

पौष्टिकतेच्या बाबतीत व आरोग्यासाठी विदेशी बोरे सफरचंदापेक्षा श्रेष्ठ मानली जातात. ही गावरान बोरे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच बोरांमध्ये अ, क जीवनसत्त्व आदी औषधी गुणधर्म तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह हे धातू अधिक प्रमाणात आढळतात

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR