20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeसोलापूरनिष्क्रिय मनपा आयुक्तांच्या हकालपट्टीची मागणी

निष्क्रिय मनपा आयुक्तांच्या हकालपट्टीची मागणी

परभणी : शहरात सध्या जागोजागी कचरा आणि घाण साचलेली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावर सगळीकडे मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली आहे. यामुळे परभणीकराचे आरोग्य धोक्यात आले असून परभणीच्या बकाल अवस्थेला महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर या जबाबदार असून त्यांची तात्काळ हाकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सोमवार, दि.१२ रोजी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

परभणीच्या नागरी वस्ती मधून जाणारा जायकवाडी कालवा हा परभणी शहराच्या बाहेरून करण्यात यावा. गायरान धारकाच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात. त्यांच्या सातबारा वरून पोट खराब हा शब्द कमी करण्यात यावा. परभणीतील नागरिकांना घरपट्टी भरण्याची सुविधा तात्काळ सुरू करण्यात यावी. महाराष्ट्रामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या आणि इतर मागण्यांसाठी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भीमशक्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस रवी सोनकांबळे, राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव, मराठवाडा महासचिव प्रा.डॉ. प्रवीण कनकुटे, मराठवाडा उपाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे, विक्रम काळे, सुहास पंडित, तातेराव वाकळे, राहुल कनकुटे शैलेश वडमारे, बबन वाहूळे, संजय वावहुळे, नितीन सावंत, प्रसाद गोरे, अभिनंदन मस्के, महबूब कुरेशी यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR