29.4 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeपरभणीआ. दुर्राणी, आ. मुटकुळे यांचे संचालकत्व रद्द

आ. दुर्राणी, आ. मुटकुळे यांचे संचालकत्व रद्द

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. बाबाजानी दुरार्णी, भारतीय जनता पार्टीचे आ. तानाजीराव मुटकुळे यांचे संचालकत्व विभागीय सहनिबंधकांनी आज रद्द केले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत या दोघा आमदार महोदयांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्या दोघांच्या सहकारी संस्थेवर बँकेची मोठी थकबाकी होती. सहकारी संस्थेवरील थकबाकी असताना सुद्धा या दोघांनी माहिती लपवली व निवडणूक रिंगणातून संचालकत्व मिळवले. दरम्यान या दोघांच्या या कृतीविरोधात बँकेचे माजी संचालक तथा आ. दुर्राणी यांचे प्रतिस्पर्धी अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार यांनी सहकार खात्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची सहकार खात्याने गांभीर्याने दखल घेतली. पाठोपाठ सुनावणी अखेर बँकेचे या दोघांचे संचालकत्व विभागीय सहनिबंधक गुट्टे यांनी सोमवारी सकाळी एका निर्णयावर निर्णयाद्वारे रद्दबातल केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR