मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणीबाबत आम्ही एकत्र बसू आणि त्यावर काय करायचे याचा विचार करू असे सांगितले. यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलायचे काहीच नाही. केवळ खोटे आरोप करून देशाला आणि सैन्याला बदनाम करायचे असल्याची टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव देण्याची मागणी केली आहे. लाडकी बहीण योजनेला अजितदादांची लाडकी बहीण योजना असे नाव देऊन त्यांच्या स्मृती सरकारने वेगळया पद्धतीने जपाव्यात. अजित पवारांना ती खरी श्रद्धांजली ठरेल असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विचारता त्यांनी, अनेक मागण्या आमच्यासमोर आहेत.
आम्ही सर्व बसू आणि त्यावर काय निर्णय घ्यायचा याचा विचार करू असे सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते देश-सैन्याला बदनाम करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राहुल गांधी यांना बोलायचेच नाही. त्यांना केवळ खोटे आरोप करून आपल्या देशाला, सैन्याला शहिदांना बदनाम करायचे आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच उरले नाही. म्हणून केवळ चर्चेत राहण्यासाठी ते असे करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

