मुंबई : मंत्री धनंजय मुंडे, माणिकाराव कोकाटे यांच्या पाठोपाठ महायुती सरकारमधील आणखी एका मंर्त्याच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुण्यातील बलात्कार प्रकरणी राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्ये अतिशय बेजबाबदारपणाचे आणि असंवेदनशील असल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे.
पुण्यातील बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी तीन दिवसानंतर पकडला गेला असला तरी या सरकारचे हे मोठे अपयश आहे. अशा घटना सावधपणे आणि संवेदनशीलपणे हाताळाव्या लागतात. मात्र मंत्रीच बेजारपणाचे वक्तव्य करतात, आरोपीलाच पाठीशी घालण्याचे काम करीत असतील त्याचा जाव विचारणे मुख्यमंत्र्यांना आवश्यक आहे.
राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांचा आम्ही निषेध करतो. पुणे हे सांस्कृतिक वारसा जपणारे शहर आहे. मात्र आता येथील प्रचंड गुन्हेगारी वाढत चालली आहे. बलात्कार, चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. काही गुंडाची दहशत वाढत चालली आहे. त्यामुळे पुण्याची ओळख पुसल्या जात आहे. या सर्व घटनांमुळे पुण्याचा नावाला काळीमा फासण्याचा काम होत आहे.
राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी नैतिक जबाबदारी या निमित्ताने घेतली पाहिजे. बेजवाबदार वक्तव्य करणारे योगेश कदम यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी अमर काळे यांनी केली. अमर काळे वर्धा मतदारसंघाचे आमदार आहेत. शरद पवार यांनी काळे यांना काँग्रेसमधून आयात करून राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली होती. त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली होती.
रामदास कदमांना टोला
गंगेत जाऊन स्रान करणे हीच काही हिंदुत्वाची खरी ओळख नाही. प्रत्येकाची हिंदुत्वाची व्याख्या वेगवेगळी राहू शकते. त्यामुळे रामदास कदम यांच्या वक्तव्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कोणी कुठे आंघोळ करावी, प्रार्थना करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे सांगून खासदार काळे यांनी कदमांना टोला लगावला.