नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, नोटबंदीमुळे देशाला मोठे नुकसान झाले आहे. याद्वारे देशातील ९९ टक्के जनतेवर हल्ला करण्यात आला. आपल्या जवळच्या व्यक्तींना याद्वारे फायदा पोहचवण्यात आला. ते म्हणाले की, नोटाबंदी हा सुनियोजित कट होता. यामुळे रोजगार नष्ट झाले असून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यांनी नोटाबंदीला एक शस्त्र म्हटले, ज्याद्वारे परम मित्राची पिशवी भरली गेली. ६०९ क्रमांकावर असलेले उद्योगपती जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.
राहुल गांधी म्हणाले की, नोटाबंदी हा सुनियोजित कट होता. देशातील नोकऱ्या नष्ट करणे, कामगारांचे उत्पन्न बंद करणे, छोटे उद्योग नष्ट करणे, शेतकऱ्यांचे नुकसान करणे आणि अर्थव्यवस्था मोडीत काढणे, असे काम झाले आहेत. ९९ टक्के सामान्य भारतीयांवर हल्ला करण्यात आला आणि मोदींच्या १ टक्के भांडवलदार मित्रांना फायदा झाला. जिवलग मित्राची पिशवी भरण्यासाठी आणि त्यांना ६०९ क्रमांकाहून जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी नोटबंदी करण्यात आली. जनतेला नुकसान पोहचवण्याचे हे एक शस्त्र होते, असे ते म्हणाले.
नोटाबंदीला बुधवारी सात वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करताना जाहीर केले होते की, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मध्यरात्री १२ पासून चलनात येणार नाहीत. त्यांनी या नोटांवर बंदी घालण्याची घोषणा केली. यानंतर ज्या लोकांकडे ५००-१००० रुपयांच्या नोटा होत्या त्यांनाही त्या जमा करण्याचा पर्याय मिळाला. त्यावेळी नोटा जमा करण्यासाठी लोक लांबच लांब रांगेत उभे असल्याचे दिसून आले. एटीएमच्या बाहेरही अशाच लांबलचक रांगा लागत होत्या.