22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकमध्ये नोटाबंदी; लवकरच येणार नवीन नोटा

पाकमध्ये नोटाबंदी; लवकरच येणार नवीन नोटा

इस्लामाबाद : पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. पाकिस्तान मोठ्या रोखीच्या समस्येला तोंड देत आहे. याशिवाय, देशात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा वापर होत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये २० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंतच्या नवीन नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद म्हणतात की, सुरक्षेचा विचार करुन नवीन नोटा प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह जारी केल्या जातील.

ते पुढे म्हणाले की, चलन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी नोटांचे डिझाइनदेखील बदलण्यात येणार आहे. नवीन नोटा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक प्रगत असतील, ज्यामुळे बनावट नोटा आणि त्यांच्यामध्ये स्पष्ट फरक करता येईल. याचा उद्देश पाकिस्तानची चलन प्रणाली, व्यवसाय आणि नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे. जुन्या नोटा एकदम बंद होणार नाहीत, पण त्यांच्या जागी हळूहळू नवीन नोटा आणल्या जातील.

नोटांची नवीन सीरिज येणार
पाकिस्तानमध्ये सध्या चलनात असलेल्या नोटा २००५ पासून जारी केलेल्या नोटांच्या बॅचच्या आहेत. या मालिकेत २०, ५०, १००, ५००, १००० आणि ५००० रुपयांच्या नोटा छापल्या जातात. मात्र आता पाकिस्तान सरकार नोटांची नवी मालिका आणणार आहे. नवीन फीचर्स असलेल्या नोटांचे स्कॅनिंग किंवा फोटोकॉपी करून बनावट नोटा छापल्या जाऊ नयेत म्हणून पाकिस्तान हे करत आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान हळुहळू चलनात असलेल्या जुन्या नोटा बाद करुन नव्या नोटा आणणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR