24 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeअंतरराष्ट्रीयनेतन्याहू यांच्या घराबाहेर निदर्शने

नेतन्याहू यांच्या घराबाहेर निदर्शने

तेलअवीव : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. गाझा पट्टीच्या आजूबाजूच्या समुदायांवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करणा-या निदर्शकांना पोलिसांनी रोखले. निळे आणि पांढरे इस्रायली झेंडे फडकावत आता तुरुंगात जा अशी घोषणाबाजी केली. हजारो लोकांनी जेरुसलेममधील नेतन्याहू यांच्या निवासस्थानाभोवती असलेले पोलिस बॅरियर देखील पार केले.

एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की तीन चतुर्थांश इस्रायली लोकांचे मत आहे की नेतन्याहू यांनी राजीनामा द्यावा. नेतन्याहू यांनी अद्याप अपयशाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली नाही ज्यामुळे अचानक हल्ला झाला. हमासने ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, १,४०० हून अधिक ठार केले आणि किमान २४० लोकांना ओलीस ठेवले. लोकांचा संताप हळूहळू वाढला आहे, गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या अनेक कुटुंबांनी सरकारच्या प्रतिसादावर जोरदार टीका केली आणि त्यांच्या नातेवाईकांना घरी आणण्याची मागणी केली.

तेल अवीवमध्ये, हजारो लोकांनी झेंडा हातात घेऊ निदर्शनं केली. कोणतीहीकिंमत मोजून ओलिसांची सुटका करा अशा घोषणा असलेले पोस्टर्स हातात होते. इस्रायलने गाझामध्ये हवाई आणि जमिनीवर हल्ले केले आहेत, ९,००० हून अधिक लोक मारले आहेत. युद्धापूर्वीही, नेतन्याहू भ्रष्टाचाराच्या आरोपांशी लढत होते. त्यानंतर आता हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी, इस्रायलच्या चॅनल १३ टेलिव्हिजनच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की ७६% इस्रायली लोकांना वाटते की आता पंतप्रधान म्हणून काम करणा-या नेतन्याहू यांनी राजीनामा द्यावा. तर ६४% लोकांनी युद्धानंतर लगेचच निवडणुका घ्याव्यात असे म्हटले आहे. सर्वेक्षणानुसार, हल्ल्यासाठी सर्वात जास्त कोण जबाबदार आहे असे विचारले असता, ४४% इस्रायलींनी नेतन्याहू यांना दोष दिला, तर ३३% लोकांनी लष्कर प्रमुख आणि वरिष्ठ आयडीएफ अधिका-यांना दोषी धरले आणि ५% लोकांनी संरक्षण मंत्री यांना दोष दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR