24.5 C
Latur
Thursday, October 24, 2024
Homeमहाराष्ट्रमहाबळेश्वर, साता-यात दाट धुके

महाबळेश्वर, साता-यात दाट धुके

वाई : महाबळेश्वर, पाचगणीसह साता-यात सर्वत्र दाट धुके आणि ढगाळ वातावरण आहे. सर्वत्र पहाटेपासून हलका व मध्यम पाऊस आणि काळवंडलेले वातावरण आहे.

आज पहाटेपासून महाबळेश्वर, पाचगणी, भिलार, सातारा शहर, वाई, भुईंज, मांढरदेव, खंडाळा, जावळी तालुक्यात दाट धुके आणि अंधारमय वातावरण आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून या परिसरात ढगाळ वातावरण आहे. थंडीही ब-यापैकी आहे. मात्र आज सकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. महाबळेश्वर, पाचगणी, सातारा परिसरात पहाटे हलका व मध्यम पाऊस झाला. दाट धुके व थंडगार वातावरण आहे.

महाबळेश्वर, पाचगणी, भिलार सर्वत्र छानशी धुक्याची चादर पसरली आहे. वेण्णा लेक परिसरावर धुके पसरल्याने परिसरातील व्यवसाय प्रभावित झाले आहेत. सातारा शहर व तालुका परिसरात पहाटेपासूनच वातावरण पूर्णपणे ढगाळ झालेले आहे. सकाळी साडेआठ-नऊ वाजताही सूर्यदर्शन नागरिकांना झाले नाही. पहाटे हलका व मध्यम पाऊस झाल्याने रस्त्यावर ओलसरपणा दिसत आहे. अजिंक्यतारा किल्लाही स्पष्टपणे सातारकरांना आज सकाळी दिसू शकला नाही. इतके ढगाळ वातावरण आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR