24.7 C
Latur
Friday, June 28, 2024
Homeमहाराष्ट्रदुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके

दुकानदाराने फोडले ग्राहकाचे डोके

मुंबई : मुंब्रामध्ये गरम समोसा मागणे एका ग्राहकाला चांगलेच महागात पडले. मुंब्रा येथील रहिवासी जियाउद्दीन शेख यांना गरमागरम समोसा खाण्याची इच्छा झाली. त्यांनी मुंब्रातील आनंद कोळीवाडा येथील माजिद शेख नामक दुकानदाराकडे आपला मोर्चा वळवला.
समोसे अनेकांचा आवडता खाद्यप्रकार आहे. स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारे समोसे गरमागरम मिळण्यासाठी खवय्यांचे प्राधान्य असते.

परंतु एका ग्राहकाला गरम समोसे मागणे चांगलेच महागात पडले. दुकानदाराकडून गरम समोसे मागितल्यानंतर दुकानदाराचा संताप झाला. त्याने ग्राहकावर हल्ला करत त्याचे डोके फोडले. त्याला जखमी केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील मुंब्रा भागात हा प्रकार घडला.

मुंब्रा येथील रहिवासी जियाउद्दीन शेख यांना गरमागरम समोसा खाण्याची इच्छा झाली. त्यांनी मुंब्रातील आनंद कोळीवाडा येथील माजिद शेख नामक दुकानदाराकडे आपला मोर्चा वळवला. त्याने समोशाची मागणी करताच दुकानदाराने त्यांना समोसा दिला. परंतु समोसा थंड असलेला पाहताच जियाउद्दीन यांनी गरम समोसा देण्याची मागणी केली. त्यावर माजिद शेख यांनी खायचा असेल तर खा नाहीतर निघ, असे ठणकावले. यावर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR