26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रआंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांची पोस्ट

आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांची पोस्ट

मुंबई : प्रतिनिधी
आज जगभर जागतिक कन्या दिन साजरा केला जात आहे. मुलींचे कोडकौतुक व्हावे, त्यांना आशीर्वाद मिळावेत याकरता हा दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्स पोस्टवर दोघांचा सुंदर फोटोही शेअर केला आहे. तसेच, राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या मुलींबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

‘या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त मुलींचा जन्म साजरा करूयात. त्यांना नेहमी नवीन उंची गाठण्यासाठी सक्षम करू या. माझ्या प्रिय दिविजाला कन्या दिनाच्या शुभेच्छा! माझा अभिमान, आनंद आणि शक्ती, स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे, भविष्याला तुझ्या नवा आकार मिळू दे.. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा!’

दिविजाचं वय आता साधारण १५ वर्षे आहे. सध्या ती शाळेत शिकत असून विविध सामाजिक कार्यक्रमांतही ती सहभाग घेत असते.

जितेंद्र आव्हाडांनीही शेअर केला जुना फोटो
जितेंद्र आव्हाड यांनीही एक जुना फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये आव्हाड म्हणाले, हा माझा आणि माझ्या मुलीचा एक जुना फोटो. हा फोटो जेव्हा जेव्हा पाहतो ना तेव्हा मन रमतं जुन्या आठवणींत. वाटते ज्यांच्या घरी मुली आहेत ते नेहमी आनंदी असतात, त्यांचं घर हसतं-खेळतं असतं. नेहमी प्रसन्न असतं. आणि हे घर आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचं नाव नताशा आव्हाड असून तिचे लग्न झाले आहे. लॉकडाऊन काळात अत्यंत साध्या पद्धतीने घरच्या घरी विवाहसोहळा पार पडला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR